पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व पुरोगामी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था पंढरपूरच्यावतीने आयोजित पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या महात्मा फुले गुणवंत प्राथमिक शाळा,गुणवंत शिक्षक मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती रजनीताई देशमुख या अध्यक्षस्थानी होत्या तर कर्मयोगी सुधारकपंत परिचारक पांडूरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतनाना देशमुख विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, युवा नेते प्रणव परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सचिव श्रीकांत शिंदे, शिक्षक समितीचे जिल्ह्याचे नेते सुरेश पवार जूनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष रियाज मुलाणी आदर्श शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब मिसाळ शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पतसंस्थेचे चेअरमन विष्णू नरळे यांनी स्वागत केले तर तालुका अध्यक्ष सुनील कोरे यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमामागील भूमिका विशद करून प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मान्यवरांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच शाळा, एक मुख्याध्यापक, एक पदवीधर शिक्षक व तेवीस प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक हे सातत्याने वाड्या-वस्त्यावरील मुलांच्या गुणवत्ता विकासासाठी धडपडत आहेत, त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत व या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही सदैव त्यांच्याबरोबर राहू असे प्रणव परिचारक यांनी याप्रसंगी सांगितले.
शासन स्तरावरून या शिक्षकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आवश्यकता भासल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊ व आपण शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन श्रीकांत शिंदे यांनी दिले.
महाराष्ट्र शासनाने कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक करू नये तसेच समूह शाळांचा निर्णय घेऊ नये अन्यथा ग्रामीण भागातील वाड्या-वस्तीवरील मुलांचे शिक्षण गुणवत्ता पूर्ण होणार नाही. या निर्णयाला आम्ही विरोध करू व प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिले.
तर अध्यक्षीय समारोपात रजनीताई देशमुख यांनी प्राथमिक शिक्षकांच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्ह्याचे नेते सुरेश पवार यांनी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मांडून त्या सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सचिव संतोष थोरात यांनी आभार मानले.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सचिन लादे, सुरेखा इंगळे कोषाध्यक्ष रमेश खारे, सल्लागार अनिल बंडगर कार्यालयीन चिटणीस चंद्रकला खंदारे प्रसिद्धीप्रमुख आण्णासाहेब रायजादे नेते किशोर गोडसे कल्याण शिंदे तालुका सरचिटणीस पोपट कापसे, सहसरचिटणीस शिवाजी जाधव कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, उपाध्यक्ष सुनिल अडगळे गोविंद कुलकर्णी मा.चेअरमन नवानाथ कवडे दत्तात्रय खंदारे सुरसेन बुधवंतराव संतोष कापसे आवेश करकमकर गुंडिबा कांबळे दत्तात्रय हेंबाडे राजेंद्र खपाले विजय जाधव बालाजी शिंदे बलभिम जाधव संचालक हेमंत माने रावण मदने संतोष कांबळे देवीदास जगताप अविनाश बुरांडे ज्ञानेश्वर दुधाणे जयवंत कापसे जूनी पेन्शन संघटनेचे बाबासाहेब घोडके विजय राऊत प्रकाश तोटेवाड संचालिका स्नेहल आमले-गावडे महिला आघाडीच्या अध्यक्षा देवकी कलढोणे, सरचिटणीस अर्चना कोळी व्हा.चेअरमन संगिता पवार सुवर्णा टकले अनिता वेळापूरकर मंगल जाधव अनिता तरकसबंद मंजिरी देशपांडे सारिका फासे शुभांगी शिंदे सुजाता गुरसाळकर संपदा परळीकर वैशाली वाघमारे महानंदा सावंत सुचित्रा मस्के भाग्यश्री अवधूत व प्राथमिक शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गुणवंत व उपक्रमशील शिक्षक शरदचंद्र चटे यांनी केले.