मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
गांधी जयंतीचे औचित्य साधून आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला पश्चिम व ३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान रॅली, स्वच्छता मोहीम, चित्रकला स्पर्धा आदीचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात अमोल जागले , जोशी , बांगारे आदी शिक्षक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक व एन सी सी ऑफिसर विश्वनाथ पांचाळ यांनी केले होते.विद्यार्थ्यांना श्रमदानाचे, परिसर व वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेच्या वतीने तसेच एन.सी.सी, आर.एस.पी आणि स्काऊट-गाईड यांच्या तर्फे नियमितपणे आयोजित केले जातात.