पंढरपूर प्रतिनिधी
कासेगाव येथील दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे हिंदी दिनानिमित्त हिंदी सप्ताह समारोप कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विवेक वर्धिनी विद्यालयातील हिंदी शिक्षक राजूभाई मुलाणी हे होते. त्यांनी हिंदी दिवसाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लवटे एम.के.हे होते यावेळी प्रशालेत हिंदी सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे ,गीत सादर केली. या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख फारुख बोहरी यांनी केले.
यावेळी पर्यवेक्षक पावले आर.बी, हिंदी विभागाच्या बेसुळके एस. आर, जाधव एस.एच. ठोंबरे पी.बी, मोरे एस.सी. व सांस्कृतिक विभाग प्रमुख कांबळे डी.बी तसेच व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.