कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यांनी शेवटपर्यंत लुटला स्वरांचा आनंद
पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सव सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या सहाव्या दिवसाचं संगीत पुष्प ख्यातनाम गायक अमोल निसळ यांच्या सुमधुर स्वरांनी गुंफताना सुरुवातीला मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब सदस्य ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड गायक अमोल निसळ गणेश तानवडे ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या शुभहस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले मान्यवर कलाकार मंडळींचा सत्कार करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरूवातीला वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी यांनी सुरुवात करत वातावरण भक्तिमय झाले.त्यानंतर अनुप जलोटा यांनी स्वरबद्ध केलेली चुनरीया झिनी रे झिनी,जग में सुंदर है दो नाम,माझे माहेर पंढरी, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा,भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा,बाजे रे मुरलीया बाजे,अशी अनेक सुंदर अभंग,भक्तीगीते,आपल्या सुमधुर आणि दमदार स्वरांनी सादर करत पंढरपूरकर कलारसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला गणेश तानवडे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम सुरंजन जायभाय सिंथेसाईजर रोहित कुलकर्णी टाळ अक्षय तळेकर यांनी सुंदर करत रसिकश्रोत्यांना भक्तीरसात चिंब केले, यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब शेवटपर्यंत उपस्थित असल्याने कार्यक्रमाला आगळावेगळा रंग भरला होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुधीर घोडके यांनी केले. यांनी मानले.पाऊस असताना सुद्धा पंढरपूरकर कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला,
उद्या गणेशोत्सव संगीत महोत्सवाची सांगता सारेगमप लिटिल चॅन्प ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या गोड सुरांनी होणार असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर समितीचे वतीने करण्यात येत आहे, महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेत आहेत.