पंढरपूर प्रतिनिधी
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद बार्शी तालुक्यातील खांडवी येथे जिल्हास्तरीय शालेय अभ्यास आट्यापाट्या स्पर्धा पार पडल्या .
या स्पर्धेमध्ये जवळपास साठ पेक्षा जास्त जिल्ह्यातील शाळांनी आपले संघ नोंदवले होते. या स्पर्धेमध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधील 19 वर्षे वयोगटातील मुली यांनी जिल्हा स्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले त्याचबरोबर 17 वर्षीय मुलांच्या संघाने त्रतीय क्रमांक पटकावला 19 वर्षीय मुलांच्या संघाने फायनल मध्ये प्रवेश केला.
सर्व स्पर्धा अतिशय चुरशीच्या व निर्णायक ठरल्या या स्पर्धेचे आयोजन खांडवी येथील जिजाऊ गुरुकुल येथे करण्यात आले होते .या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा विभागाचे तानाजी मोरे, आट्यापाट्या संघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कापसे, संभाजी घाडगे, विकास बागल.उपस्थित होते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे,सहशिक्षक राजेंद्र भोसले, दीपक देशमुख, नियाज मुलाणी, शितल बागल, वर्षा मोरे, शितल बागल, मोनाली गायकवाड,सीमा रकटे, अजय मोरे, संतोष पवार, सोमनाथ भूईटे, आदींनी शुभेच्छा दिल्या.