जैनवाडी प्रतिनिधी
जैनवाडी येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रा.गणेश जमदाडे यांची निवड करण्यात आली.तसेच समितीची पुनर्रचना करुन उपाध्यक्ष व इतर सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.तालुकाध्यक्ष दिपक पवार यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व इतर सर्व सदस्य आपली जबाबदारी ओळखून काम करतील असा आशावाद व्यक्त केला. या शाळेतून अनेक विद्यार्थी घडले आहेत. एमपीएससी सारख्या परीक्षेतून अनेक विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली असल्याचे सांगितले.शाळेतील सर्व शिक्षक शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे सांगितले. शाळेच्या भौतिक व गुणात्मक विकासाबाबत गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी बोलताना नूतन अध्यक्ष प्रा.गणेश जमदाडे यांनी शाळेच्या भौतिक व गुणात्मक विकासात शाळा व्यवस्थापन समिती महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे सांगून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची माहिती सांगितली.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणात अमूलाग्र बदल होणार आहे. भारताला जागतिक स्तरावर ज्ञानाच्या बाबतीत सुपर पॉवर बनण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाचा उपयोग होणार आहे.असे मत त्यांनी मांडले
त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.तालुकाध्यक्ष दिपक पवार, विलास गोफणे, मोहन माने, अभिमान गोफणे, बिभीषण पवार, सत्यवान पवार, मुख्याध्यापक सुभाष यलमार, प्रशांत ननवरे सर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.