अमरावती प्रतिनिधी
कलानगरी वेलफेअर सोसायटी ही संस्था गेल्या साडे तीन वर्षांपासून कलाकारांना न्याय व हक्का साठी सातत्याने कार्यरत आहे.
कलाकारांना आपलं हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश घेऊन कला नगरी वेलफेअर सोसायटी या संस्थेच्या अंतर्गत कला क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवत असतात. असाच महाराष्ट्राती तळागाळातील ग्रामीण व शहरी भागातील लेखक दिग्दर्शक व कलाकारांनाच्या कलाकृती ला प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने कलानगरी वेलफेअर सोसायटी अमरावती या संस्थेच्या अंतर्गत चित्रसंघर्ष लघुपट व गीत महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे, आणि या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिक देण्यात येणार
तसेच आणखी उत्कृष्ट 50 पारितोषिक जाहीर करण्यात येतील.
या स्पर्धेचे काही नियम लघुपट व गीत हे मराठी भाषेतच असावे
२) लघुपटाचा कालावधी 30 मिनिटाच्या आत असावा.
३) गीत हे 6 मिनिटाच्या आत असावे.
४) स्पर्धेत परिक्षकांचा निर्णय हा अंतिम राहिल.
५) सहभागी सर्व लघुपट व गीत स्पर्धकांना सन्मानपत्र प्रदान केल्या जाईल.
६) लघुपट व गीत हे सामाजिक, शैक्षणिक व शेतकरी या विषयावर आधारित असावे.
७) लघुपट व गीत पाठवण्याची अंतिम तारीख 10 आक्टोबर 2023 ही राहिल.
महोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी संपर्क
सागर भोगे :- 9146288502
आशिष सुंदरकर :- 7020776706
अमोल कोयकार :- 9096250048