भाळवणी प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा भाळवणी ग्रामपंचायत युनियनच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असुन मंगळवार दिनांक १२ /०९/२०२३ पासुन बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी हर्षद गवळी,राहुल शिंदे,दादा गवळी हे उपस्थित होते.
यावेळी कल्याण गवळी म्हणाले की सोमवार दिनांक ११/०९/२०२३ रोजी दुपारी ३:३० च्या दरम्यान जिल्हापरीषद बिंदु नामावली धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणानुसार शिक्षक भरती करावी या मागणीसाठी समाजाच्या काही आंदोलनकर्त्यानी मा मनिषा आव्हाळे मॅडम यांच्या कार्यालयाची चुकीच्या मार्गाचा अवलंब करुन नासधुस व तोडफोड करण्यात आली असुन मरा ग्रामपंचायत जिल्हापरीषद नगरपरीषद कामगार युनियनच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत असुन चुकीच्या व अवैध मार्गाने गोंधळ घालणा-या कार्यकर्त्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत.
तोपर्यंत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हापरीषद नगरपरीषद कामगार युनियनच्या वतीने दिनांक १२/०९/२०२३ मंगळवार रोजी पासुन सोलापुर जिल्हा युनियनच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करण्यात येणार आहे गावातील लाईट, स्वच्छता, पाणीपुरवठा,आदि बाबी व कार्यालयीन कामकाज पुर्णपणे बंद ठेवण्यात येवुन अशा निंटनिय घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत असे चुकीचे कृत्य करणा-यावर कडक शासन व्हायलाच पाहीजे तरच अशा घटना पुन्हा कोणी करण्याचे धाडस करणार नाही ही विनंती करण्यात आली आहे.