मुंबई प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून शिंपी समाजाच्या मागण्याना प्रतिसाद अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्ली शाखा महाराष्ट्राच्या वतीने नुकतेच प्रदेशाध्यक्ष महेशजी ढवळे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मंत्रालय मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन शिंपी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले होते. या निवेदनात राज्य शासनाकडे शिंपी समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात चर्चा करून विनंती केली होती कि समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात असे मा देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती .अध्यक्ष ढवळे यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सदरील पत्रावर गंभीरपणे विचार करून पुढील कार्यवाही साठी पत्रावर. रिमार्क करून पाठवल्याचे पत्र आज प्राप्त झाले असून अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ व समस्त शिंपी समाज बांधवांच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील हे या पत्रावर निश्चित झाले आहे त्यामुळे प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे यांच्या प्रयत्नांना लवकरच यश प्राप्त होनार आहे हे निश्चित आहे .
या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महेश ढवळे यांचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.