वेळापूर प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील मौजे दसुर येथील पेट्रोल पंपा समोर एका बोलोरो पिकप वाहनाचा फिल्मी स्टाईल सारखा अपघात झाल्याची घटना काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
सदर या घटनेबाबत अधिक माहिती अशी की KA .29 B4862 या बलोरा पिकअप पुणे हून पंढरपूरच्या दिशेने निघाले असताना दसुर येथील पेट्रोल पंपा समोर बलोरो पिकपचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती वाहनचालकाकडून दिली जात आहे. तर तेथील ग्रामस्थांकडून असे बोलले जात आहे की सदरचा वाहन ओव्हरलोड असल्याने त्याचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला असून हा अपघात फिल्मी स्टाईल सारखा घडला आहे तसेच हा अपघात भयंकर होता मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.