ठाणे प्रतिनिधी
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचा समाजसेवेचा वसा पुढे नेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जनसेवा करत आहेत.आनंद दिघे साहेबांनी दिलेली हीच शिकवण पुढे नेत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन देण्यासाठी शनिवार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ठाणे पश्चिम खारकर आळी परिसरातील शक्तिस्थळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आणि शिवसेनेच्या वतीने पहिल्या टप्प्यात २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ठाणे आणि आसपासच्या शहरातील गरजू रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
-खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे