पंढरपूर प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्य कनिष्ठ विभागात ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम राबवून देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या जवानांना विद्यार्थिनींनी पोस्टाद्वारे राख्या पाठवून सैनिकांप्रती असलेला आदर द्विगुणित केला. विद्यार्थिनींनी दिलेल्या राख्या 2 Rashtriya Rifel
Near HMT factory, Zainakot, Srinagar, Pin-190012 , 56 APO व No – 460942 N, SUB- MAHADEV KADAM, 24MARATHA .L.I, C/O – 56APO, PIN – 911624, PUNE मुख्यालय येथे पाठविण्यात आल्या.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सर्वधर्मभाव, निष्ठा, त्याग, समर्पण आदी भावना रुजुविण्यासाठी विविध उपक्रम कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून ’एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे आणि सहकारी शिक्षकांचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. मुसळे आर एस यांनी अभिनंदन केले.