भाळवणी प्रतिनिधी
श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले,मुली भाळवणी ता. पंढरपूर येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी ई. बा. मुलाणी म्हणाले की अभिजित आबा पाटील यांनी अतिशय कमी वयात गरुड भरारी घेतली आहे. साखर कारखाना चालवणारा माणूस म्हणून नवीन ओळख निर्माण केली आहे. आपला वाढदिवस साजरा करताना त्यांनी सामाजिक कार्याचे भान ठेवून विध्यार्थ्यांना वह्या वाटप केले आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
यावेळी ज्ञानेश्वर खरडकार ,अर्जुन लिंगे,जिगर गायकवाड,जयराम शिंदे,हरिभाऊ लिंगे,भोजलिंग बाबर,संजय बाबर,शशिकांत विभुते,किशोर खरडकार, चंद्रकांत गवळी,शंकर गवळी ,नामदेव मानेदेशमुख,सहदेव नवाडे,संभाजी चौगुले,अमर सातपुते हरी बुरांडे,आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश गवळी,शिक्षक, शिक्षिका यांनी केले. तर आभार सद्दाम सैय्यद यांनी मानले.