पंढरपूर प्रतिनिधी
दि.१३ ऑगस्ट दै.पंढरी भूषण व सा.दिपज्योती परिवाराच्या वतीने देण्यात येणारा व मानाचा समजला जाणारा या वर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार यशोदा प्रतिष्ठान संचलित सनराईज पब्लिक स्कूल शेळवे या प्रशालेस भव्य समारंभात विशेष मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे,महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघाचे मा.अध्यक्ष बाळासाहेब काळे, महाराष्ट्र राज्य. प्राथ. संघाचे मा. जिल्हा कार्यध्यक्ष जोतिराम बोंगे,ज्ञानप्रसाद अकॅडमी चे मंदार परिचारक,कृषी उत्पन्न बाजार समिती चे नवनिर्वाचित संचालक महादेव (अण्णा) बागल,तालुका प्राथ.शिक्षक सोसायटीचे चेअरमन एकनाथ फाळके,व दै.पंढरी भूषण चे संस्थापक-संपादक शिवाजीराव शिंदे उपस्थित होते, या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला...
२०१५ साली स्थापन झालेल्या या प्रशालेने शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक तसेच कला, क्रीडा, साहित्य,वक्तृत्व व स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शेकडो विध्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे.फक्त शैक्षणिकच नाही तर सामाजिक क्षेत्रात ही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, ग्रामिण तसेच शहरी व निमशहरी भागातील गोरगरीब शेतकरी,कष्टकरी कुटुंबातील सामान्य व होतकरू विध्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्याचं काम येथील अध्यापक् वृंद प्रामाणिकपणे करत आले आहेत, कोरोनाच्या लाटेत आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या विध्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत शिक्षण देणारी ही एकमेव खाजगी प्रशाला असून,आजपर्यंत त्या विद्यार्थ्यांचा पूर्ण शैक्षणिक खर्च प्रशाला उचलत आहे..
केंद्र सरकारच्या आर. टी. ई २५% धोरणाची काटेकोर अंमलबजावणी सणराईज पब्लिक स्कूल शेळवे प्रशालेत केली जात असून आजपर्यंत पन्नास हुन अधिक विध्यार्थी मोफत शिक्षणाच्या या योजनेचा लाभ घेत आहेत...
आजपर्यंत या प्रशालेचे जिल्हा तसेच राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शंभरहून अधिक विध्यार्थी चमकले असून,राज्य शासनाकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा,इतर स्पर्धा परीक्षा, नवोदय,केंद्र शासनाच्या एन.एस.एस ई; एन.एम.एम.एस व राज्यशासनाच्या सारथी गुणवत्ता यादीतही अनेक विध्यार्थ्यांनी प्रत्येकी चार वर्षासाठी वार्षिक बारा हजारापर्यंत शिष्यवृत्ती मिळवली आहे..
कोल्हापूर,सांगली येथील पूरपरिस्थिती मध्ये प्रशालेच्या वतीने पूरग्रस्त लहान मुलांसाठी शंभर हून अधिक ड्रेस व एक आठवडाभर पुरेल इतका किराणा माल देण्याचं कार्य सणराईज प्रशालेच्या वतीने केलं गेलं,शेळवे व पंचक्रोशीतील पूरग्रस्तांना आपल्या प्रशालेत सर्व सोई सुविधांनी युक्त असा निवारा उपलब्ध करून देऊन त्यांना किराणा मालाचे वाटप करण्याचं सामाजिक कार्य प्रशालेच्या वतीने करण्यात आले,वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप,व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, विविध शेती विषक कार्यक्रम, माती परीक्षण विषयक चर्चासत्रे,विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन,पालकांसाठी, विध्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम,खेळ आणि पुरस्कार,विविध सहशालेय उपक्रम, विध्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस मित्र व निर्भया पथकाचे आयोजन करून विध्यार्थ्यांना अभय देण्याचे कार्य प्रशालेकडून नियमित करण्यात येते. महाराष्ट्र राज्याचे मा.उप-मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,विध्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे, स्व.सिंधुताई सपकाळ,स्व.आ. भारत नाना भालके,पुणे विभागाचे मा.आ.दत्तात्रय सावंत,संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेखर निकम,शेतकरी-कामगार पक्षाचे नेते, माजी मंत्री स्व.आ.भाई गणपतराव देशमुख,सांगोला विधानसभेचे आमदार शहाजी बापू पाटील,सांगली जिल्ह्याचे आय पि एस अधिकारी राहुल चव्हाण,तहसिलदार सुशीलकुमार बेल्हेकर, पि.एस.आय गजानन गजभारे,गणेश पाटील,पल्लवी पवार, उप शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे, मयूर लाडे,जि.प सदस्य शैलाताई गोडसे,नगराध्यक्ष साधनाताई भोसले,युवा उद्योजक तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील,गुरुवर्य मार्गदर्शक बी.पी रोंगे,जेष्ठ साहित्यीक द.ता भोसले,ग्रामिण कथाकार आप्पासाहेब खोत.युवा कीर्तनकार-प्रवचनकार अविनाश भारती ई.व इतर अनेक जेष्ठ-श्रेष्ठ आदरणीय मार्गदर्शक मंडळींच्या कौतुकास पात्र ठरलेली प्रशाला म्हणून सनराईज पब्लिक स्कूल शेळवे ही प्रशाला राज्यभर नावारूपास आली आहे..
गुणवत्तेमधील सातत्य व विद्यार्थ्यांकडे वयक्तिक लक्ष या गोष्टींमुळे परिसरातील जवळपास १५ गावातून विध्यार्थी या प्रशालेत शिक्षण घेत असून,दरवर्षी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेशाची नोंदणी होत असून,त्यातून निवड करून क्षमतेनुसार प्रवेश दिले जातात,प्रविष्ट विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षक प्रयत्नशील राहतात..
विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेला संस्थापक आणि शिक्षकवर्ग,सहकार्यासाठी सदैव तत्पर असलेला पालक वर्ग आणि खंबीरपणे सोबत उभा राहणारा मित्रपरिवार हेच या प्रशालेच्या यशाचे रहस्य असल्याचे बोलले जात आहे...!!
जिल्ह्यातून असंख्य शाळांमधून ग्रामिण भागातील उदयोन्मुख सनराईज पब्लिक स्कूल शेळवे ही शाळा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवडले बद्दल प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे, संस्थापक सचिव अंकुश गाजरे, संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे व अखंड सनराईज परिवाराकडुन दै. पंढरी भूषण व साप्ताहिक दिपज्योती परिवाराचे सर्वेसर्वा शिवाजी शिंदे यांचे आभार मानले व दाखवलेल्या विश्वासास पात्र राहण्याचे अभिवचन देण्यात आले,सदर पुरस्कारासाठी संस्थेचे सर्व सदस्य, सनराईज पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक,कर्मचारी,विध्यार्थी, पालक व सनराईज परिवारातील सर्व घटक यांचे खूप मोठे योगदान असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी सांगितले व सर्वांचे आभार व्यक्त केले...!!