सोलापूर प्रतिनिधी
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमासाठी निवड झालेल्या सोलापूरच्या आनंद कुरापाटीने निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मिडीयम शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.संवादातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संकल्पना मांडला. भारताचे महान अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी झालेल्या संवादाविषयी अनुभवाचे प्रकटीकरण केला. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमासाठी निवड झाल्याबद्दल नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आनंद कुरापाटीचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका श्रीमती विजयालक्ष्मी कुंभार,श्रीधर भंडारी, पालक वेणुगोपाल कोंतम आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांनी आनंद कुरापाटीने घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याचे सांगताना आनंदचे मुख्याध्यापिका म्हणून शाळेतील अनुभव सांगितल्या. घरची परिस्थिती ही हालाकीची असताना जिद्द, चिकाटी, व परिश्रम घेवून शिक्षण घेतला.अनेक संकटावर देखिल त्यावर मात करुन, कमवा व शिका हे धोरण समोर ठेवले. आई- वडिलांच्या कष्टाला यशाची गवसणी घातला आणि तो पुर्ण ही केला. आनंद हा राजराजेश्वरी शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्या यशामुळे नेताजी शिक्षण संस्थेचे नाव उज्वल झाल्याचे सांगितले.सोमवार दि.२८ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता सोनी हिंदी लाईव्ह या चॅनलवर कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम प्रसारण होणार आहे तरी सर्वांनी आनंद कुरापाटीचा मुलाखत पहावे असे आवाहन या निमित्ताने मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांनी केल्या. सूत्रसंचालन केदार कुंभार यांनी केले तर किरण कदम यांनी आभार मानले. यावेळी सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते.