माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
वेळापुर (शेरी) येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन १० दारे ते शेरी रस्त्यासाठी २ कोटी ३१ लाख ३९ हजार रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने देशमुख,अमर भाऊ माने देशमुख, अमृत भैय्या माने देशमुख ,विक्रम भाऊ माने देशमुख, माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, कमलाकर माने देशमुख , कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन सावंत, शिवामृत दूध संघाचे संचालक सुरेश पिसे,माजी पंचायत समिती सदस्य नानासाहेब नाईकनवरे, धनंजय माने देशमुख, श्रीकांत काका देशमुख,ग्रामपंचायत सदस्य दिपक राऊत, माजी सरपंच आण्णासाहेब शेंडे, अमृतराव माने देशमुख, दिपक चव्हाण, माजी उपसरपंच शंकरराव काकुळे साहेब, अर्जुन भाकरे व वेळापूर शेरी मधील ग्रामस्थ उपस्थित होते.