पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर मध्ये 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांची 'हर घर तिरंगा' प्रभात फेरी काढण्यात आली.
यामध्ये विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम्,घर घर तिरंगा ,हर घर तिरंगा ,अशा घोषणा देत आजादी का अमृत महोत्सव निमित्त जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी हातामध्ये देशभक्तीपर घोषवाक्य, असणारे फलक घेतले होते. ही प्रभात फेरी विद्यार्थी प्रशालेच्या परिसरातील लोक वस्तीमध्ये काढून पालकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानामध्ये सहभागी होण्याचा संदेश याद्वारे देण्यात आला.
यासाठी प्रशालेचे प्राचार्य मुंढे यु.आर. पर्यवेक्षक सुनील पाटील , क्रीडा शिक्षक महादेव रणदिवे ,शिवाजी येडवे, राजुभाई मुलाणी, संजय क्षीरसागर, मासाळ एस टी, काळेल पी जी, गुरव एस एच, टकले के एस,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.