सोलापूर प्रतिनिधी
गेले 28 वर्षापासून श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण, शिक्षणाधिकारी ते शिक्षण विभागातील भोंगळ कारभारामुळे आमच्या कुटुंबावर खूप मोठा अन्याय झाला. कायदेशीर संघर्ष करत असताना न्यायालयाचे निकाल ही आमच्या बाजूने असून देखील आम्हाला नैसर्गिक न्याय तत्त्वावर न्याय मिळाला नाही. व या संघर्षात कै.धोंडीराम अर्जुन खरात हे गेले. त्यांच्या मुत्यु पश्चात तरी नैसर्गिक न्याय मिळावा.म्हणून त्यांचा संघर्ष आम्ही तसाच पुढे चालू ठेवला, परंतु त्यातूनही आम्हाला न्याय मिळत नसल्याने आमच्यापैकी या त्रासाला कंटाळून हिम्मतराव धोंडीराम खरात यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2023 ला आत्मदहन करणार असल्याचे केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाला निवेदन दिली.
तरी आज दिनांक 13/8/2023 रोजी चा दिवस उजाडुन देखील आमच्या निवेदनाची गंभीरतेने दखल घेतली गेली नाही. जो शिक्षणाधिकारी, संस्थाचालक व शिक्षण विभाग दोषी पदाधिकारी आहे त्यांना पाठीशी घालण्याचे काम शासन विभाग करत असल्याचे हिम्मत धोंडीराम खरात यांच्या लक्षात आल्याने ते अचानक घरातून निघून गेले आहेत. तरी त्याने घरी यावे अशी कुटुंबाची विनंती आहे ,त्याने जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नये अशी आमची कळकळीची विनंती आहे. आणि जर त्यांनी त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्याला सर्वस्वी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण व इतर पदाधिकारी शिक्षणाधिकारी ते शिक्षण विभाग जबाबदार असतील. हा मेसेज हिम्मत धोंडीराम खरात व महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन यांच्या सरकारी अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्या करिता आम्हाला मदत करावी. ही विनंती खरात कुटुंब फलटण यांची आहे.