पंढरपूर प्रतिनिधी
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली ची बैठक पंढरपूर येथे रविवारी ३ सप्टेंबर २०२३ रोजी अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ दिल्ली,संलग्न महाराष्ट्र राज्य शाखेची एक दिवसीय महत्वपूर्ण बैठक योगा भवन एलआयसी ऑफिस मागे येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे १६ वंशज ह.भ.प.मुकुंद महाराज व ह.भ.प.माधव महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नानासाहेब पाथरकर प्रदेश अध्यक्ष महेशजी ढवळे,टोणीजी,राजपालजी, ज्वालाप्रसादजी,श्रीमती रेखाताई वर्मा,महादेव खटावकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
या बैठकीला देशातील १३ राज्यातील व महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्य उपस्थित राहणार असून या बैठकीत शिंपी समाजातील सामाजिक,राजकिय सांस्कृतिक,शैक्षणिक,तसेच विविध विषयांवर सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत सदर बैठकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
यासाठी राज्य प्रदेश संघटक मनोज भांडारकर, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख संतोष मुळे,पंढरपूर समाज अध्यक्ष गणेश उंडाळे, आनंद बंगाळे,दिनकर पंतगे, दिलीप बंगाळे,प्रशांत माळवदे, अनिल जांवजळ, ज्ञानेश्वर वडे हे अथक परिश्रम घेत आहेत.