भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामस्थांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे याबाबतचे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भिडे यांनी महात्मा फुले यांच्यावर विषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी रणजीत जाधव म्हणाले की,संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यापेक्षा प्रात्यक्षिक जोडे मारण्याचे योग्य होईल त्यांनी बेताल वक्तव्य करणे बंद केले पाहिजे अन्यथा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून भाळवणी येथील ग्रामस्थांनी पोलीस अधिकारी जाधव यांना निवेदन देऊन संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी सरपंच राजकुमार पाटील,विजय शिंदे,नितीन शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी भगवान चौगुले, हरिभाऊ शिंदे, दीपक गवळी,सुनिल पाटील, सरपंच राजकुमार पाटील,रणजीत जाधव,नितीन शिंदे,प्रवीण शिंदे,धैर्यसिंह निंबाळकर,सचिन भोसले,विजय शिंदे,अमोल लिंगे,जयसिंग पवार,शिवाजी लिंगे,संजय बाबर,बाजी मोरे,दत्ता लोखंडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.