कडेगांव प्रतिनिधी
दि.१५.७.२३ रोजी वांगी ता.कडेगाव येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७३ वा संजीवन समाधी सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.
पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री महाराजांचे मूर्तीस विधिवत अभिषेक झाला तदनंतर ९:३० वाजता ह.भ.प सिद्धनाथ महाराज शामगाव यांचे महाराजांचे चरित्रपर सुश्राव्य कीर्तन झाले तदनंतर आरती व फुलांचा कार्यक्रम संपन्न झाला.
तदनंतर महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घेतला.

