कल्याण प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर
रविवार दिनांक ९ जुलै २०२३ रोजी मध्य प्रदेश भोपाळ येथे हाॕटेल विद्याश्री येथे प्रशिक्षण शिबीर तसेच कार्य समितीची बैठक आयोजित केली होती.
या कार्यक्रमात *अखिल भारतीय ग्राहक संरक्षण संस्था* *All India Consumer Protection Organisation*या संस्थेच्या वतीने मुंबई प्रदेश ,महाराष्ट्र(महिला शाखा) च्या अध्यक्षपदी सुरेखा गावंडे यांचे नाव घोषित करण्यात आले.
अखिल भारतीय ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरिशंकर शुक्ल तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साधनाताई गावंडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र तसेच स्मृतीचिन्ह देऊन सुरेखा गावंडे यांना सन्मानित करण्यात आले.
कल्याण-पूर्वच्या समाजसेविका वर्षाताई कळके यांची अखिल भारतीय ग्राहक संरक्षण संस्थाच्या महाराष्ट्र प्रदेश(महिला)उपाध्यक्ष तसेच राधिका शिवणकर यांची महाराष्ट्र प्रदेश(महिला)सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.वर्षाताई कळके,राधिका शिवणकर यांना यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
भारतीय मानक ब्युरोचे वैज्ञानिक डाॕक्टर श्रीधर पांडे,श्री राजेश पिल्लई,डाॕ.देवेन्द्र दुबे यांनी ग्राहक जागृतीसाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपिठावर राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री ओम भारद्वाज, डाॕ.शिवकुमार,संदिप सूरी,अजय चौधरी उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या हस्ते उपभोक्ता उडान या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी कार्यकारी अध्यक्ष श्रीमती सिमरन उपाध्याय यांनी मेहनत घेतली. राजस्थान, तामिळनाडू,आंध्रप्रदेश,महाराष्ट्र,केरळ आदि भारतातील विविध भागातील संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेरो शायरी ऐकवून सर्वांना भारावून टाकून, अतिशय सुंदर,खूमासदार असे या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री पान्डे यांनी केले.
सुरेखा गावंडे या लेखिका, गीतकार ,दिग्दर्शिका आहेत. त्यांची सात पुस्तके प्रकाशित आहेत.मराठी चित्रपटासाठी त्यांनी गीत लेखन केले आहे. कोकणदिप, साहित्यरत्न ते राष्ट्रीय साहित्य गौरव अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

