पुणे प्रतिनिधी
नामदेव शिंपी समाज तळेगाव ढमढेरे तालुका शिरुर, जिल्हा पुणे यांच्या वतीने कळविण्यात अत्यंत आनंद होतो की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आषाढ कृष्ण १३ शनिवार दिनांक १५ जुलै २०२३ रोजी नामदेव महाराज व परिवार व संत जनाबाई यांचा ६७३ वा समाधी सोहळा पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आपण सर्वच्या सहकार्याने व सहभागाने आनंदात व उत्साहात आपल्या विठ्ठल रूक्मिणी संत नामदेव मंदिरात साजरी करण्याचे ठरवले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढीप्रमाणे असणार आहे याची सगळ्यांनी नोंद घावी.
अनु क्र कार्यक्रम वेळ
१. श्री नामदेव महाराज आणी विठ्ठल रूक्मिणी महाअभिषेक सकाळी ५:०० ते ७:०० समाजाच्या वतीने
२. हरी नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात दिंडी नगर प्रदक्षिणा सकाळी १०:०० ते १२:३०
३. महा प्रसाद दुपारी १२:३० ते ३:००
४. महिला वर्गाचा नित्य हरिपाठ संध्याकाळी ४:०० ते ५:००
५. भजनाचा कार्यक्रम रात्री ८:३० ते १२:००
टीप :- १) सर्व समाज बांधवांची संपूर्ण कार्यक्रमात सह-कुटुंब उपस्थिती प्रार्थनीय आहे.
२) प्रथम समजच्या वतीनेच महा अभिषेक होईल व त्या नंतर इतर कोणाला भक्ती भावाने स्वेच्छने अभिषेक पूजा करायचा असल्यास ते करू शकतात.
3. महान संतांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करणे हे आपले परमभाग्य आहे.हा आनंदात कार्यक्रम साजरा करण्यासाठी व कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा समस्त नामदेव शिंपी समाज तळेगाव ढमढेरे यांनी व्यक्त केली आहे.

