चिपळूण प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने कोंडमळा (तालुका चिपळूण) येथील शिवसेना शाखेतर्फे भव्य दिव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे यांच्या उपस्थितीत नांगरणी स्पर्धेचा शुभारंभ पार पडला. यावेळी प्रताप शिंदे यांनी शेतीपरंपरा, ग्रामीण शेतकरी आणि शिवसेना यावर मौलिक मार्गदर्शन केले.
स्पर्धेत सुमारे 58 नांगराणी सहभाग घेऊन एक थरार निर्माण केला होता. पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी चिपळूण तालुक्यातील बहुसंख्य शिवसेना नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देवून आयोजकांना धन्यवाद दिले. सावर्डा विभाग प्रमुख संदीप राणे, शाखाप्रमुख चंद्रकांत राडे, रमेश राजेशिर्के, सुनील गुरव आणि शाखेतील सारे शिवसैनिक यांनी अपार मेहनत घेऊन कार्यक्रम भव्य दिव्य घडवून आणला यावेळी नागरिकांची गर्दी उपस्थिती लक्षणीय होतीच.
शिवाय डोळ्यांचपारण फेडणार एकापेक्षा एक सरस बैल जोड्या पाहणं ही एक पर्वणीच ठरली. शेतीतील परंपरा, नांगरणीची किमया याच यथार्थ दर्शन नवीन पिढीला घडविणारा हा कार्यक्रम आयोजित आणि उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल शेतकरीवर्ग आणि उपस्थित नागरिक कोंडमळा शाखेला धन्यवाद देत होते, समाधान व्यक्त करीत होते.