महुद प्रतिनिधी
वाकी -शिवणे गावचे युवा कार्यकर्ते मा निलेश बाळासाहेब राऊत यांची राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन सदर निवडीचे पत्र राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.सुधिरभाऊ गाडेकर यांनी कुर्डुवाडी येथे देण्यात आले.
निलेश राऊत यांना प्रथमपासूनच सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे..गणेश उत्सव असो की राष्ट्रीय पुरुषांच्या जयंत्या त्या कार्यक्रमात ते हिरीरीने सहभाग नोंदवतात.संत सेना महाराज जयंती महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सांस्कृतिक व समाउपयोगी उपक्रम राबवले आहेत.
आशा कार्यक्रमाच्या माध्यमातून राउत यांनी युवकांची मोठी फळी निर्माण केली आहे. निवडीचे पत्र मिळाले बरोबर त्यांनी आपली पुढील दिशा जाहीर केली.या पदाच्या माध्यमातून गावोगावच्या समाज बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आसलेचे सांगीतले.. येणाऱ्या काळात कोणत्याही गावातील समाज बांधवांचा जटील प्रश्न असला तरी तो संविधानीक पध्दतीने सोडवला जाईल.. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून सर्व समाज घटकांतील व्यक्तींना समान न्याय दिला आहे याची जाणीव समाजबांधवांना करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले
राज्यसरकारने नाभिक समाजाच्या प्रगतीसाठी अर्थ संकल्पात १००कोटीची तरतुद केली असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.. त्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी व समाजबांधवांना अर्थसाह्य मिळावे यासाठी राज्य व जिल्हा स्तरीय समाजबांधव एकत्रीत करुन लोकशाही मार्गाने प्रयत्न करणार आसलेचेही राउत यांनी सांगीतले.
सदर निवडी प्रसंगी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक आबासाहेब मोहिते उपस्थित होते तसेच सोनु पवार,माउली काळे,अमोल भुसे,निलेश चव्हाण, जनार्दन जोरकर, हरिभाऊ राऊत इत्यादी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.