सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉंलॉजी डेव्हलपमेंट चे डायरेक्टर, डी. वाय पाटील विद्यपीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ संशोधक डॉ. शिवाजी.एच.पवार लिखित व नोव्हा सायन्स पब्लिशर्स,यु. एस. ए. प्रकाशित " सिल्क फायब्रॉईन: ऍडवांसेस इन ऍप्लिकेशन अँड रिसर्च" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते व सिंहगड इन्स्टिट्यूट चे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक २४जुलै २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे अशी माहिती सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी दिली.
पुढे बोलताना डॉ. शंकर नवले यांनी सांगितले की रेशीम कोळी व रेशीम किडे यापासून मिळणारे रेशीम म्हणजेच सिल्क हे पदार्थविज्ञान संशोधनासाठी महत्वाचा घटक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. सिल्क हे प्रोटिन्स ने समृद्ध असल्यामुळे व त्याच्या असलेल्या विशिष्ठ जैवगुणधर्मामुळे ते इतर पॉलिमर्स पेक्षा सरस ठरते. डॉ. एस. एच पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकात जगभरातील अनेक संशोधकांनी सिल्क सायन्स या विषयावर अत्याधुनिक संशोधनपर लेखाचे योगदान दिले आहे.
या पुस्तकामुळे सिल्क सायन्स व टेक्नॉलॉजी ला नवा आयाम मिळणार असून नवसंशोधकांसाठी हे पुस्तक पर्वणी ठरणार आहे.अमेरिकेतील नोव्हा पब्लिशर्स ही नामवंत प्रकाशन संस्था असून या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामुळे निश्चितच डॉ. एस. एच. पवार सर व पर्यायाने सोलापूर चे नाव संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर उंचावले आहे याचा सार्थ अभिमान आहे अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

