ईगतपुरी तालुका प्रतिनिधी
ईगतपुरी तालुक्यातील आहुर्ली परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरुच आहे.नुकताच आहुर्ली जवळील नांदडगाव या गावातील एका शेतकर्याच्या गोठयात शिरुन वाघोबानीं बकरीची मेजवानी झोडल्याची घटना उघडकीस आली आहे.दरम्यान या घटनेमुळे आहुर्ली परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.
आहुर्ली जवळील नांदडगाव या गावातील गंगाराम सोनवने या शेतकर्याच्या गुराच्यां गोठयात घुसुन वाघाने बकरीचा फडशा पाडला आहे.
दरम्यान यापुर्वी ही आहुर्ली - सांजेगाव मार्गे वाडिवर्हे,गोंदे दुमाला, सातपुर, ईगतपुरी व अबंड या औद्योगीक वसाहतीत कामासाठी ये जा करणार्या कामगारांसह शेतकर्यानां व अनेक वाहनचालकानांही वाघोबाने रात्री बेरात्री दर्शन दिलेले आहे.
या बाबत येथील जागरुक नागरिकानीं वन विभागाच्या कानावरही ही गोष्ट कळवलेली आहे.
दरम्यान या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असुन नागरिक रात्री घराबाहेर पडण्यास घाबरु लागले आहेत.तर अनेकानां आपल्या पशु धनाची चिंता भेडसावु लागली आहे.
वाघाचा बंदोबस्त करावा
नांदडगाव येथील शेतकर्याची पशुधनाची मोठी हानी झाली असुन अन्य शेतकरी ही धास्तावले आहेत.
वनविभागाने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी, अन्यथा सदर वाघाद्वारे मनुष्य बळीची पिंपळगाव मोर येथील घटनेसारखी घटना घडु नये.
--- प्रविण शिवाजी पा. खातळे
रा.यु.का.तालुका उपाध्यक्ष,ईगतपुरी

