बुद्ध वासी महादेव भालेराव ( मा. नगराध्यक्ष) नगरसेवक, राजकारणातील अजात शत्रू व्यक्तिमत्व, दिलदार मित्र, सर्वांना बरोबर घेऊन विकास साधणारे, "मनासारखा राजा" राजासारखे मन असणारे ..सर्वांच्या सुखदुःखात सामील होणार ऋषितुल्य व्यक्तिमत्व .लहान असो वा मोठा सर्वांशी प्रेमाने निस्वार्थी भावनेने ,स्नेह जपणारे आदर्श व्यक्तिमत्व. विश्वासू राजकारणी .राजकारणातील मोठ्या पदापेक्षा आपल्या नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून सामाजिक बांधिलकी जपणार दिलदार व्यक्तिमत्व ".He is king".. But democratic King" या उक्तीप्रमाणे लोकशाहीत लोकांचा विकास साधणारे प्रामाणिक व्यक्तिमत्व, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पंढरपूर मधील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण, तसेच नियोजित बुद्ध विहारासाठी यमाई तुकाई तलाव परिसरात दहा एकर नगरपालिकेची जमीन देण्याचा ठराव पत्नी उज्वलाताई भालेराव नगराध्यक्ष असताना करण्यात आला.
पत्नी उज्वला ताई भालेराव या नगराध्यक्ष पदावर असताना भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदासजी आठवले तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,तत्कालीन देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तत्कालीन पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे तत्कालीन पंढरपूर मंगळवेढ्याचे विधानसभेचे आमदार भारत नाना भालके या सर्व नेतेमंडळी सोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली .मोठ्यांच्या आशीर्वादाबरोबर लहान थोरांच्या सदस्यांचा शुभेच्छांचा वर्षाव सदैव त्यांच्या पाठीशी असत.
शारीरिक स्थिती खालवलेली असताना प्रबळ मनाने प्रभागांमध्ये फिरून जनतेची समस्या सोडवणे मग तो प्रश्न पाण्याचा असो, अथवा हाय मास्ट दिव्यांचा प्रश्न, दवाखान्याचा प्रश्न असो अथवा रस्त्याचा ..स्वतः जातीने लक्ष घालून पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करत. आपल्या प्रभागांमध्ये कोरोना साथीच्या प्रादुर्भावांमध्ये जनतेची काळजी घेणे, मास्क, सॅनिटायझर रोगप्रतिकारक शक्ती गोळ्यांचे मोफत वाटप करणे, कोरोना काळात जनतेला भाजीपाला व फळांचे वाटप इ.कामे त्यांनी केली. शिक्षित व सुशिक्षित महिला वर्ग तरुण पिढीसाठी रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून मोफत चष्म्याची वाटप केले आहे. पावसाळ्यापूर्वी वार्डातील नाले सफाई इ. या सर्वच कार्यावरून आपण वार्डातील जनतेवर किती उदात्त भावनेने प्रेम करत होता याची प्रचिती येते.. केवळ वार्डातीलच नव्हे तर सर्व जनतेशी असणारा आपला स्नेहसंबंध म्हणजे "प्रेमाने जग जिंकता येते" ही म्हण आपल्या बाबत सार्थक ठरते. अधिकार असताना नम्र राहून सर्वांच्या सुख दुःखात सामील होणे, प्रत्येकाच्या मदतीस धावून येणार व्यक्तिमत्व अर्थात काय तर....
"स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगून पहावं .. कोणीही नसलं आपलं तरी आपण मात्र सर्वांचं व्हावं......... अशा जननायकास अखेरचा निरोप भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🙏
डॉ.श्रीधर यलमर

