जोगेश्वरी प्रतिनिधी पूनम पाटगावे
जोगेश्वरी पूर्वेकडील संजय गांधी नगर येथील केनोरिटा माॅल नजीकच्या जोगेश्वरी स्टेशन कडे जाणार्या भूयारी मार्गामधील दिवे बर्याच दिवसांपासुन बंद अवस्थेत होते. याच बंद असलेल्या दिव्यांसंदर्भात मनसेने सातत्याने मनपा व अदानीच्या अधिकार्यांकडे पाठपुरावा केला. या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करुनही दिवे लावण्याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याचे मनसेच्या निदर्शनास आले. मनपा व अदानी कडे पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न मिळाल्यामुळे मनसेचे उपाध्यक्ष प्रविणजी मर्गज, विभाग अध्यक्ष बाबभाई पिल्ले, स्थानिक शाखाध्यक्ष रमाकांत नर, उपविभाग अध्यक्ष मंगेश गुरव, महिला सचिव अमृता मोरे, महिला शाखाध्यक्ष दक्षा घोसाळकर, कार्यालय अध्यक्ष योगेश रेळे, उपशाखाध्यक्ष रवी मलतवाडकर, हेमंत मोबारकर, करण शर्मा, रोहित हेडाउ, रोहित मोरे, संजय शिंदे आदी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अदानीचे उपमहाव्यवस्थापक महेश खंडाळे यांची बुधवार दि. १९ जुलै २०२३ रोजी कार्यालयात भेट घेऊन भुयारी मार्गामधील परिस्थितीवर चर्चा करत तेथे दिवे त्वरित बसवून देण्याबाबत विनंती केली.
मनसेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संजय गांधी नगर केनोरीटा मॉल नजीकच्या जोगेश्वरी स्टेशनकडे जाणाऱ्या भुयारी मार्गांवरील बऱ्याच दिवसांपासून बंद असलेले दिवे अखेर शुक्रवार दि.२१ जुलै २०२३ रोजी लावण्यात आले. मनसेच्या तक्रारीची दखल घेत त्वरित दिवे बसवुन मागणी पूर्ण करत अदानीने नागरिकांना दिलासा दिला. अदानी व मनपा ने दखल घेत दिवे लावले त्याबद्दल मनसेने त्यांचे आभार व्यक्त केले.

