सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनवली 'दुहेरी अक्ष सौर ट्रॅकिंग' प्रणाली.यामध्ये हवामान निरक्षण क्षमतासह एकत्रित सौरऊर्जा आहे. यामध्ये ऊर्जेचा स्वच्छ आणि नूतनीकरण स्त्रोत यामुळे सौर ट्रॅकिंग सिस्टीमची कार्यक्षमता सुधारते.सौर पॅनल दिवसभर सूर्याच्या स्थितीत करून संरेखित करून सौर पॅनेलची हवेतील पर्यावरिणिय घटकांमुळे कार्यक्षमता आणि सुरक्षितता हवामान परस्थितीचा आढावा घेऊ शकतो. दुहेरी अक्ष सौर ट्रॅकिंग विकसीत करण्यावर भर दिला असून क्षेतीज आणि उभ्या दोन्ही समतलांमध्ये सौर पॅनेलची असणारी प्रणाली असून सूर्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन सौरउर्जेपासून जास्तीत जास्त रेडिएशन शोषणे, त्यावर परिणामी करणारी ऊर्जा निर्मिती वाढते.
यामध्ये वातावरणीय परिस्थितीवर रिअल टाइम डेटा गोळा करण्यासाठी हवामान निरक्षण सेन्सर, जसे तापमान, आद्रता, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्य पातळी इत्यादी पॅरामीटर्स मोजले जातात आणि त्याचे विश्लेषण केले जाते. हा डेटा सौर पॅनेलच्या कार्यक्षमतेवर हवामानाच्या प्रभावांचे मूल्यांकन केले जाते. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी संमित पाटील, समर्थ पाटील, सुप्रिया वावरे या विद्यार्थांनी परिश्रम घेतले व प्रा.माणिक शिंदे यांनी या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रविंद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागप्रमुख प्रा.विजय कुमार बिरादार, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

