पंढरपूर प्रतिनिधी
आज दिनांक १५ जुलै २०२३ रोजी आदमापूर येथील प्रसिध्द बाळु मामा ची भाकणूक (भविष्य वाणी) करण्याचा मान असणारे गुरू माऊली कृष्णा डोणे महाराज व कुकुरमुंढे मठाचे अधिपती ह.भ.प. श्री उध्दव महाराज यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
त्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गुरू माऊली कृष्णा डोणे महाराज यांचा व कुकुरमुंढे मठाचे अधिपती ह.भ.प. उध्दव महाराज यांचा स्त्कार मंदिरे समितीचे सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे व सदस्या श्रीमती शकुंतला नडगीरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा उपरणे व दैनंदिनी देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी भरत दादा गुरव व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

