अधिकाऱ्याची नियुक्ती वादग्रस्त ठरणार असल्याची रंगली चर्चा
खडकी प्रतिनिधी
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयांमधील मुख्य अभियंता म्हणून सुहास संत 31 जुलै रोजी निवृत्त होत आहेत, मात्र निवृत्तीच्या अगोदरच बोर्डाच्या बैठकीत त्यांना पुन्हा घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. बोर्डाच्या बैठकीत संत यांना निवृत्तीच्या अगोदरच पुन्हा ठेकेदारी पद्धतीवर घेतल्याने मोठा प्रश्नचिन्ह उभा निर्माण झाला आहे.
बोर्डातील अभियंता विभागातील अभियंता एस. एम. संत हे 31 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीच्या अगोदरच सुमारे चार दिवस अगोदर बोर्डाची बैठक 27 जुलै रोजी संपन्न झाली होती. या बैठकीत संत यांना पुन्हा घेण्याचा प्रस्ताव मांडून हा प्रस्ताव संमत करण्यात आला, मात्र निवृत्तीच्या अगोदरच संत यांना घेतल्याने मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला.
बोर्ड प्रशासनाकडे 2 सहाय्यक अभियंता तर 3 कनिष्ठ अभियंता सध्या काम करीत आहेत, या विभागामध्ये 5 अभियंते काम करीत आहेत. मात्र तरी देखील संत यांना 50 हजार रुपये मानधनावर एक वर्षासाठी ठेकेदारी तत्त्वावर अभियंता म्हणून घेण्यात आले आहे. सहा महिन्यानंतर पन्नास हजार रुपये मानधना मध्ये बदल होणार असल्याचा स्पष्ट उल्लेख प्रस्तावामध्ये करण्यात आला आहे, दरम्यान निवृत्ती होण्याच्या अगोदरच संत यांना बोर्ड प्रशासनाने घाईघाईने बोर्डाच्या बैठकीत संत यांचा विषयी आणण्याची का घाई केली असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
संत यांची नियुक्ती वादग्रस्त असल्याची चर्चा खडकीकरात रंगली आहे. बोर्डाची आर्थिक परिस्थिती मजबूत नसल्याने बोर्ड प्रशासनाने मोठ्या न झोपणाऱ्याच्या पगारावर ठेकेदारी तत्त्वावर कर्मचारी नियुक्त करण्यात करू नये असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. संत यांना त्याच पदावर न घेता अभियंता म्हणून घेऊन अन्य अभियंतांना प्रशिक्षण देण्याचे काम करावे, प्रशिक्षण झाल्यानंतर या पदावरून दूर करण्यात यावे तसेच निवृत्तीच्या अगोदरच संत यांना घेण्याची घाई का करण्यात आली याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी खडकीकर करीत आहेत.
निवृत्ती झाल्यानंतर बोर्ड प्रशासनाने आरोग्य निरीक्षक म्हणून सुमारे 2 वर्षांपूर्वी निवृत्त झालेले विलास खांदोडे यांना तसेच 31 जुलै रोजी निवृत्त होणारे मुख्य अभियंता एस. एम. संत यांना पुन्हा कामावर घेण्याचा प्रस्ताव बोर्डाच्या बैठकीत मांडण्यात आला होता, निवृत्त झालेला कर्मचाऱ्यांना घेऊ नये याबाबत एडवोकेट पूजा अमोल सहारे यांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ रॉबिन बलेचा यांना निवेदन दिले होते. बोर्डाच्या बैठकीत उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांनी देखील विरोध केला होता, ऍडव्होकेट सहारे आणि भापकर यांच्या विरोध केल्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्या पैकी विलास खांदोडे यांना न घेण्याचे आदेश बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर डी. जी. पटवर्धन यांनी दिले. एडवोकेट सहारे यांनी बोर्ड प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनामुळे नियुक्ती रद्द करण्यात आल्याने सहारे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.