पंढरपूर प्रतिनिधी
‘लक्ष्मी हायड्रॉलीक्स’ या नामांकीत कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील आठ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
मोटार व गिअर बॉक्स या क्षेत्राशी संबंधीत असलेल्या ‘लक्ष्मी हायड्रॉलीक्स’ या नामांकित कंपनीच्या समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या रेणुका रामचंद्र क्षीरसागर, श्रेयस अविनाश साखरे, प्रशांत बाळू क्षीरसागर, प्रशांत शिवाजी सिरसकर, दीपक विठ्ठल विभूते, हर्षवर्धन रमेश शिंदे, स्नेहल विजय यड्रावकर व मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील स्वप्नील बसवराज माशाळकर अशा मिळून आठ विद्यार्थ्यांची निवड केली. 'एलएचपी' या नावाने ओळख असलेली ही ‘लक्ष्मी हायड्रॉलीक्स’ कंपनी इलेक्ट्रिकल मोटार, गिअर मोटार आणि गिअर बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग करते. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे.
विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘लक्ष्मी हायड्रॉलीक्स’ या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या आठही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.