भाळवणी प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना भाळवणी गटाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र रुग्ण तपासणी, उपचार, मोफत ऑपरेशन व नाममात्र दरात चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सह.सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, साईनाथ अभंगराव, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, भगवानराव चौगुले, ई.बा. मुलाणी, हरिभाऊ शिंदे, दीपक गवळी, दिलीप भानवसे, सरपंच राजीव पाटील, सुनील पाटील, दाऊद शेख, शकील काझी, प्रताप म्हेत्रे, धोंडीराम शिंदे, रणजीत जाधव, पोपट इंगोले, सचिन कूचेकर, प्रमोद माने, भीमराव जाधव, डॉ. नंदकुमार जगताप, डॉ. नवनाथ खांडेकर, डॉ. राजेंद्र लाले, सचिन भोसले, निहाल शेख, अरुण लोखंडे,संदीप जाधव,सागर चौगुले,सुधाकर माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साईनाथ अभंगराव म्हणाले की येथील नेत्र तपासणी शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा.
यावेळी कल्याणराव काळे म्हणाले की शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केली आहे.हे सामाजिक कार्य चांगले आहे.येथे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.हि अभिमानाची बाब आहे.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोणतीही पोस्टर बाजी न करता सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करा.त्याप्रमाणे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे.त्यास लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.यापुढे हि अनेक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या नूतन संचालक पदी सुनील पाटील यांची निवड झाल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते फेटा,शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सेनेचे दिपक सुर्वे यांनी केले.तर प्रास्तविक नितीन शिंदे यांनी केले.तर आभार प्रवीण शिंदे यांनी मानले.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी महेश इंगोले,माऊली सावंत,पवन शिंदे,भैय्या पटेल,विलास माने,शिवाजी लिंगे, यांनी प्रयत्न केले.परिसरातील ग्रामस्थ व शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.