माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये आज पर्यंतच्या कालावधीमध्ये केळी ह्या विषयावर बोलणारे व विधानसभेमध्ये आवाज उठवणारे आमदार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे पहिलेच आमदार आहेत.म्हणून अकलूज येथे सर्व महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन सत्कार केला.
त्यावेळी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण ,महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल नाना माने पाटील, मार्गदर्शक संचालक विजयसिंह गायकवाड, सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, माढा तालुका अध्यक्ष केशव गायकवाड ,राज्य संचालक संजय रोंगे, पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष उपाशे ,राज्य तज्ञ संचालक हनुमंत चिकणे , पंढरपूर तालुका उपाध्यक्ष नितीन चव्हाण, पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष सागर रणदिवे, माळशिरस तालुका उपाध्यक्ष मगर रवींद्र बोबडे हे उपस्थित होते.
त्यावेळी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने केळी ह्या पिकाचा भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये समावेश करावा अशी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांना विनंती करण्यात आली व निवेदन दिले.

