पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहरापासून जवळच असलेल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या लक्ष्मी टाकळी परिसरातील प्लॉट धारक एरिया मध्ये भुरट्या चोऱ्या करणाऱ्यानी डोके वर काढले असून असाच प्रकार मागील महिन्यात हनुमान नगर भागात अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील सामान अस्ताव्यस्त पसरून हाती जास्त काही न लागल्याने चोरी वाया गेली.
असाच प्रकार दिनांक 24 च्या पहाटे हनुमान नगर मध्ये राहणारे आमचे तेज न्युज चे पंढरपूर शहर प्रतिनिधी,जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे हे नेहमीप्रमाणे पहाटे आपल्या उद्योगाला गेले असताना अज्ञात चोरट्याने घर फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला या परिसरात कॉर्नरवर राहणाऱ्यांनी सांगितले की अज्ञात व्यक्ती हे दोघेजण मोटरसायकल वरून आल्या होत्या त्या हनुमान नगर परिसरात फिरताना पहिल्या पहाटेच्या वेळी यामध्ये जास्त वर्ग नसतो याचाच फायदा घेऊन हे अज्ञात चोरटे घर फोडण्याचा प्रयत्न करतात यापूर्वीही प्लॉटवर एरियामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या जोरात झालेले आहेत.
वारी पूर्वी या परिसरात ग्रामीण पोलिसांची शहर पोलिसांची गस्त जास्त असायची परंतु वारी बंदोबस्त व इतर कारणामुळे ही गस्त बंद झाल्याने भुरटे चोर, चोरटे यांचे फवत आहे. मध्यंतरी अनेकांच्या दुचाकी वाहनातील पेट्रोल चोरीचे प्रकार घडल्याची चर्चा पण आहे. आता ग्रामीण पोलीस आणि ग्रामीण भागात टाकळी परिसरात परत एकदा गस्त वाढविणे गरजेचे आहे. या प्रकाराने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी पोलिस अधिकारी यांनी गस्त वाढून चोऱ्यावर आळा घालावा.अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ यांनी केली आहे.

