सोलापूर प्रतिनिधी
26 जुलै कारगिल दिवस .. वीर शहिदांच्या अमर स्मृतीस अभिवादन करीत सर्वत्र हा दिवस साजरा केला जातो. देशासाठी प्राणांची तमा न बाळगता अविरत लढत राहणाऱ्या शूर मुत्सद्दी जवानांना सलाम करण्याकरिता श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम ने आज 'कारगिल दिवस' साजरा केला.
विद्यार्थ्यांमध्ये या देशभक्तीची आस निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हाती कार्यक्रमाची सूत्रे सोपविली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का विभूते, अनुष्का हत्तरसंग मिताली पाटील अमृता शृंगारपुरे आदिती डांगे या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहिदांना आपल्या गाण्यातून नमन करीत इशिता गुमडेलने देशभक्तीपर गीत तर नृत्याविष्कार संस्कृती गवंडी यांनी सादर केले . अमर जवान प्रतिकृती तसेच फलक लेखन व पोस्टर रंगकाम दर्शन हिरकुर विश्व जाधव अमेय जवंजाळ अखिलेश अकेन साई कुमार सामल, सुप्रीतराज पुरूद यांनी केले. कारगिल दिवसाचे महत्त्व आपल्या भाषणातून प्रगती तिपरादी अनुराधा म्हेत्रे पूर्वा जाधव सिद्धार्थ काटकर शलाका मठ जयवर्धन गवळी यांनी केले.
पी.पी.टी प्रेझेन्टेशन मधून कारगिल लढाई तसेच परमवीर चक्र प्राप्त शहिदांची माहिती व कारगिल दिवसाचे महत्व दहावीच्या विद्यार्थिनी आकांक्षा पाटील गौरी उप्पिन सौंदर्या कलशेट्टी या विद्यार्थिनींनी सादर केले... स कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री अरुण कुमार तळीखेडे (जिल्हाध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघटना) व श्री रणजीत निमिग्रे होते. तर अध्यक्षपदी शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश राऊत व सुपरवायझर श्री शिवराज बिराजदार होते.
अध्यक्ष भाषणात अतिथिनी कारगिल लढाईचे प्रत्यक्ष वर्णन व प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी तैनात राहून आपली भूमिका कशी पार पाडली याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. देशभक्ती हा फक्त भाव नसून ती कर्तव्यातही उतरली पाहिजे असे कथन आपल्या अनुभवाच्या बोलातून विषद केले. शाळेच्या वतीने स्निग्धा जाधव हिने धन्यवाद दिले. हा कार्यक्रम शाळेच्या सामाजिक शास्त्र विभागातर्फे सादर करण्यात आला याप्रसंगी या विभागाच्या सौ नष्टे विजयालक्ष्मी श्रुती सचिन कुलकर्णी व नागेश्वरी कोंगारी उपस्थित होते.