सांगोला प्रतिनिधी
समाज कार्यासाठी समाज संघटन हे ब्रीद वाक्य घेऊन स्थापन केलेल्या सावता परिषद संघटनेचा महाराष्ट्रभर कार्य चालू आहे. माळी समाजाच्या सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, सर्वांगीण विकासासाठी सावता परिषद कार्य चालू असते. नुकतेच सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याणरावजी आखाडे यांचा पंढरपूर दौरा झाला.
त्यावेळी सावता परिषद सांगोला तालुका उपाध्यक्षपदी विशाल म्हेत्रे यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.त्यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, मंगळवेढा पंढरपूर मतदार संघाचे अध्यक्ष संदीप मांडवे, सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, मराठवाडा संपर्कप्रमुख विष्णू खेत्रे,सावता परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष साधना राऊत,सावता परिषदेचे संपर्कप्रमुख शिवाजी येवारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव,सावता परिषद युवक सोलापूर जिल्हाध्यक्ष सयाजी बनसोडे,वैभव आखाडे, साळीक्राम खेत्रे आदी उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना विशाल म्हेत्रे म्हणाले की सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी चांद्यापासून बांधापर्यंत संघटना बांधण्यास सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे मीही सांगोला तालुक्यात सर्व समाज घटकापर्यंत पोहोचून सावता परिषदेची ताकद वाढवून असे म्हेत्रे यावेळी म्हणाले.

