एटापल्ली प्रतिनिधी
मणिपुर राज्यात घड़लेल्या महिला अत्याचार विरोधात आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व अश्लील व्हिडीओ प्रकरणी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवार 25 जुलै रोजी एटापल्ली येथील संविधान चौकात निषेध व निदर्शन आंदोलन करण्यात आले.
यावेळी किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केले तसेच मणिपुर राज्यात महिलांची नग्न धींड काढून महिलांवर राजरोसपने अन्याय-अत्याचार करण्यात येत असल्याने देशात सुरक्षितता न राहिल्याने मोदी व भाजपा सरकारवर सड़कुन टीका करण्यात आले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी, मणिपुरची घटना मानवतेला व स्त्री जातीला काळीमा फासणारी असून देशासाठी घृणा व लांच्छनास्पद प्रकार व निषेध करायला शब्दही अपूरे पडणारे असून मोदी 'मन की बात' पेक्षा 'जन की हाल' लक्षात घ्यावे असे म्हणत भाजपा व मोदी सरकारवर सड़कुन टिका करून किरीट सोमय्या यांच्यावर तात्काळ कठोर शिक्षा करण्याची तीव्र व एकमुखी मागणी केले आणि या विरोधात अहेरी उप जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने, निषेध, आंदोलनाची मालिका राबवून लवकरच मोठ्या स्वरुपात जनाक्रोश मोर्चा काढण्याचा ईशाराही रियाज शेख यांनी यावेळी दिले.
तसेच युवा सेना तालुका अधिकारी अक्षय पुंगाटी यांनी यावेळी मणिपूर राज्यात गेल्या दोन महिन्यापासून तेथील समुदायांमध्ये जातीयवाद हिंसाचार चालू आहे. परंतु मणिपूर राज्यातील घटनेकडे केंद्र सरकारचे अजिबात लक्ष नाही आणि त्यावर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यावर संसदेमध्ये भाष्य करत नाही आणि संसदेच्या बाहेर जाऊन त्यावर थोडक्यात भाष्य करतात मग जे नवीन संसद भवन उभारलेले आहे त्याचा नेमका अर्थ काय? हे संसद भवन भारतीय जनता पार्टीच्या स्वार्थासाठी आणि त्यांच्या फायद्यासाठी उभारण्यात आलेला आहे का हा प्रश्नचिन्ह उद्भवतो. केंद्र सरकार समान नागरी कायदा आणणार यापेक्षा मणिपूर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अगोदर नीट करावे. ही बाब अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे. मणिपूर घटनेतील दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओ प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी.
यावेळी आंदोलनात शिवसेना (उ.बा.ठा.) तालुकाप्रमुख मनीष दुर्गे, नगरसेवक नामदेव हीचामी, महिला आघाडी तालुकाप्रमुख अरुणाताई निकोडे, महिला आघाडी तालुका ग्रामीण राजश्रीताई जांभुळकर, शिवसेना विभाग प्रमुख किशोरजी कांदो, शिवसेना तालुका संघटक प्रमोदजी देवतळे, युवासेना उपतालुका अधिकारी सुजल वाघमारे, शिवसेना शाखाप्रमुख तेजस गुजलवार, युवासेना तालुका संघटक महादेव हिरा आदि शिवसेना पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.