३० विद्यार्थ्यांची जापनीज,२४ विद्यार्थ्यांची इटालियन,२४ विद्यार्थ्यां ची स्पॅनिश भाषेसाठी निवड
सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील ७८ विद्यार्थ्यांची परदेशी भाषेच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली असून यामध्ये ३० विद्यार्थ्यांची जापनीज भाषेसाठी ,२४ विद्यार्थ्यांची इटालियन भाषेसाठी ,२४ विद्यार्थ्यांची स्पॅनिश भाषेसाठी निवड झाली असल्याचे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्याल याचे प्राचार्य डॉ.शंकर नवले यांनी सांगितले. यामध्ये कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभाग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग विभाग , इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश असून अशा ७८ विद्यार्थ्यांची ' असेंचर ' कंपनीमध्ये आवश्यक असलेल्या भाषेच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षात ऑनलाईन माध्यमातून स्पॅनिश, इटालियन, जापनीज प्रशिक्षण मिळणार आहे. यामुळेच विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात शिकत असतानाच चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे, डॉ.प्रदीप तपकीरे ,डॉ.दत्ता त्रय गंधमल, डॉ.विनोद खरात, प्रा.विजयकुमार बिरादार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या निकत शेख व तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांनी अभिनंदन केले

