सोलापूर प्रतिनिधी
माहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) नागपूर या संस्थेच्या एम.पी.एस.सी परीक्षा प्रशिक्षणातून 20 विदयार्थ्यांची विक्रिकर सहाय्यक पदी निवड झालेली आहे. यात 14 इतर मागास वर्ग, 5 विमुक्त जाती- जमाती, 1 विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांचा समावेश आहे.
माहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) नागपूर या संस्थेमार्फत इतर मागासवर्ग , विमुक्त जमाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांना राज्यात तसेच केंद्र शासनात सेवेची संधी प्राप्त व्हावी या करीता एम.पी. एस.सी परिक्षा प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. या योजनेतर्गंत विदयार्थ्यांच्या आर्थिक तसेच शैक्षणिक गरजा लक्षात घेता विदयावेतनही पुरविले जाते.
यशस्वी उमेदवारांमध्ये राहुल जेंगठे, गायत्री गलखे , पियुष डोंगरे , मारूति शेंदगे , रूपाली खाडे ,जलिंदर कसार , पोपट करांदे, सत्यजित साबळे , संतोष अंबुले , ऋतुजा मसाळ, आविनाश वाघमारे , मयुर लोणकर , परेश भावसार , स्वाती डोंगरे , मयुर देवरे, जगदिश केदार , हरिश शिंदे , वैभव नन्नवरे , रिंकल हडके, प्रशांत बोरकुट या विदयार्थ्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे यातील राहूल जेंगठे हा विदयार्थी राज्यात पहिला आला आहे. राहूलने आपल्या या यशाचे श्रेय आपल्या पालकासोबत महाज्योतीला,व महाज्योतीच्या प्रशिक्षक वर्गाला तसेच प्रशिक्षणा दरम्यान दिल्या जाणाऱ्या विदयावेतनाला दिलेले आहे.
वर्ष 2020-21 या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग , विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी जाहिरतीच्या माध्यामातून नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील विदयार्थ्यांकडून महाज्योतीच्या संकेत स्थळावरून अर्ज मागविण्यात येतात . पात्र विदयार्थ्यांना एम.पी.एस.सी. परीक्षा प्रशिक्षण योजनेत सहभाग दिला जातो.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी सर्व उर्तीर्ण विदयार्थ्यांचे अभिनंदन केले. राहुल जेंगठे या विदयार्थ्याचे विशेष कौतुक केले. विदयार्थ्यांनी एम.पी.एस.सी. परिक्षा प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले नागपूर यांनी केले आहे.
विक्रिकर सहाय्यक पदी राज्यात पहिला आलेला राहुल विजय जेंगठे या विदयार्थ्याचे मनोगत -
घरी दोन एकर भात शेती . त्यावर आमच्या कुटुंबाची गुजरबसरन चालते . माझे शालेय शिक्षण जिल्हा परिषेदेच्या शाळेत झाले. सिंदेवाही तालुक्यात बी.ए.केले . शिक्षणात गोडी वाढली. तसे स्वप्न मोठे होऊ लागले. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. महाज्योतीच्या स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण योजनेत सहभाग घेतला. प्रशिक्षाणादरम्यान विदयावेतनाचा लाभ मिळाला. शैक्षणिक आणि इतर दैनंदिन खर्च उचलला गेल्यामुळे निश्चिंत मनाने अभ्यास करता आला. यशस्वी होता आले. आज मी विक्रिकर सहाय्यक पदी राज्यात पहिला आलेलो आहे. हे प्रामाणिक प्रयत्नांचे यश आहे. पालकांच्या मेहनतीचे आणि महाज्योती विदयार्थ्यांसाठी राबवत असलेल्या प्रयत्नांचे यश आहे.


