राजापूर प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
महाराष्ट्रात आज कितीतरी प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत.पूर्वी जाहीर केलेले प्रकल्प पूर्णत्वास जाण्याअगोदरच नवा प्रकल्प घोषित करायचा आणि प्रकल्पग्रस्थांना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या,असा तुघलकी कारभार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.सरकार कोणतेही येवो,प्रकल्पग्रस्थांची परवड थांबलेली नाही.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कळसवली कोष्टीवाडी धरण प्रकल्पामुळे येथील जमीनमालकांचे आयुष्य झाले आहे.सरकारने कागदोपत्री नोटीस पाठवून ग्रामस्थांची पूर्व परवानगी न घेता येथील कोष्टी वाडी लघु पाटबंधारे योजनेसाठी जमीन संपादन करण्यात आली.ग्रामस्थांना विश्वासात न घेता जबरदस्तीने येथील जमीन संपादन करुन लेखी हमी घेण्यात आली.सदर प्रकल्पास ग्रामस्थांनी विरोध केला.श्रमिक मुक्ती दल संघटनेचे डाॅ.भारत पारणकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.वारंवार पत्रव्यवहार केला.परंतु त्याला कोणताच प्रतिसाद दिला नाही.२००६सालापासून बुडीत क्षेत्रातील रहिवासी पुनर्वसनाची मागणी करीत आहेत.मा.अप्पर जिल्हाधिकारी,रत्नागिरी यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन बुडित क्षेत्राची पाहणी केली आणि विशेष बाब म्हणून पुनर्वसनासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश तत्कालीन कनिष्ठ अभियंता यांना दिले.
त्यांनी कोणतीच दखल न घेतल्याने श्रमिक मुक्ती दल संघटनेच्या वतीने तो प्रस्ताव सादर करुन कोकण विभागीय आयुक्त यांना ३१/१२/२०२१रोजी पाठवला,आजवर कोणतेच उत्तर नाही.२००६पासून सदर प्रकल्पाचे काम चालु झाले,त्यापासून भूभाडे देणे बंधनकारक असताना सरकारने त्यातही बनवाबनवी केल्याचे दिसून येते.२००६च्या संयुक्त मोजणी पत्रकात बांध बंदिस्त(ताली)मोजणी येणे आवश्यक होते.परंतु तत्कालीन अधिका-यांनी त्याकडे जाणुन बुजून डोळेझाक केली.आजही हा विषय प्रलंबित आहे.बुडित क्षेत्रात रस्ता येत असल्यामुळे ग्रामपंचायत,तलाठी,आदी शासकीय कार्यालयात जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.सर्व्हे नं.१३२हा १३,१/२(तेरा एक द्वितीयांश)हेक्टरचा भूभाग प्रकल्पापासून सुरु होतो.तो सर्व्हे नं.१३२भूभाग प्रत्यक्षात संपादन केलेला नव्हता,कळसवली कोष्टीवाडी धरणग्रस्त संघर्ष समिती व श्रमिक मुक्ती दल यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा सभेत खरेदीसाठी मंजूरी मिळवली.
परंतु ती फक्त ६.१/२(सहा पूर्णांक एक द्वितीयांश)हेक्टरच हवी असे सांगण्यात आले.व आजतागायत याचाही मोबदला मिळालेला नाही.तरी संबंधित अधिकारी वर्गाने कळसवली कोष्टीवाडी धरणग्रस्तांच्या मागणीची गांभिर्याने दखल घेऊन योग्य ती नुकसान भरपाई आणि पुनर्वसन करुन न्याय मिळवून द्यावा,अशी धरणग्रस्तांची कळकळीची मागणी आहे.

