गडचिरोली प्रतिनिधी
महेशजी केदारी गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख अहेरी जिल्हाप्रमुख रियाजभाई शेख , अहेरीविधानसभा संपर्कप्रमुख श्री शिवाजी घोडदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ करुणाताई जोशी यांचे अध्यक्षतेखाली लक्ष्मीपूर येथे भर पावसाळ्यात मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सिरोंचा तालुक्यातील शिवसेना महिला आघाडी व शिवसेना तर्फे जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला.या शुभप्रसंगी सायंकाळी सहा वाजता लक्ष्मीपूर येथे दोन गरीब इसमाचे घर जाळलेले होते त्यांना मदत करण्यासाठी महिला आघाडीचे जिल्हा संघटिका सौ करुणाताई जोशी यांचे अध्यक्षतेखाली अन्नधान्य व जीवन उपयोगी वस्तूंची तसेच आर्थिक मदत गरजूंना शिवसेना पक्षातर्फे करण्यात आली. यावेळी प्रमुखअतिथी म्हणून शिरोंचा तालुकाप्रमुख श्री उज्वल तिवारी व अनेक महिला आघाडीचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते .
यावेळी साहेबांच्या वाढदिवस साजरा करताना जय भवानी जय शिवाजी अशी उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा करण्यात आली या शुभप्रसंगी अनेक महिला करुणाताई जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक महिला शिवसेनेत प्रवेश केले माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्त साप्ताहिक मदतकार्य शेतकरी व गरजू लोकांना मजुरांना शिवसेना पक्षाच्या वतीने मदत कार्याचे साप्ताहिक अभियान राबविण्यात येणार आहे. असे शिवसेना महिला आघाडीचे जिल्हा संघटिका करुणाताई जोशी यांनी यावेळी लक्ष्मीपूर येथे आपले मनोगत व्यक्त करताना मत व्यक्त केले शिवसेना शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनतेच्या पक्ष आहे.आम्ही शिवसेनेचे वतीने प्रत्येक गावात खेड्यापाड्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचे विचार घराघरात पोहोचविणार या शुभप्रसंगी शिवसेना महिला आघाडी करुणाताई जोशी यांनी बोलून दाखविले.
या कार्यक्रमात ग्रामीण तालुका प्रमुख दुर्गेश तोकला युवा सेना तालुकाप्रमुख रुपेश नुकुम अशोक उमरी सुरेश कुंबरी नागराज गोरला न्याज खान शैलेश सोनवणे कविता चंपा श्रवंती चीत्याला रघु जाडी श्याम कुमार शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते