केळशी प्रतिनिधी
केळशी-जि. प. केंद्र शाळा केळशी नं. १ विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी स्वप्निल साखरकर हिची पडवे, रत्नागिरी येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी वर्गासाठी निवड झाली आहे. वैष्णवी ने इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत 220 गुण प्राप्त केले आहेत
या तिच्या यशाबद्दल दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिघे आणि गटशिक्षणाधिकारी बळवंतराव यांनी तिचे अभिनंदन केले आहे. या तिच्या यशामागे वर्ग शिक्षिका दिप्ती दत्तात्रय माळवदे यांची मेहनत आहे. तिला कोणतीही खाजगी शिकवणी अथवा क्लास नव्हता.
या परीक्षेचा अभ्यास शिक्षिका दिप्ती माळवदे यांनी घेतला. त्यांची मेहनत व माझे मामा डॉ.स्वप्निल सुहास गुहागरकर यांनी दिलेले प्रोत्साहन व मार्गदर्शन तसेच माझ्या आईने .सुयोगी स्वप्निल साखरकर हिने माझ्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत व मार्गदर्शन आणि माझे आजोबा सुरेंद्र दिनकर करदेकर यांचे आम्हाला असलेले सहकार्य यामुळेच हे यश मला मिळाले असे मनोगत वैष्णवी ने व्यक्त केले आहे .तसेच केळशी परिसरातून वैष्णवी चे अभिनंदन व कौतुक होत आहे.