'भारतीय मराठा संघाने' आझाद मध्ये जाऊन मराठा वनवास यात्रेला दिला पाठिंबा.
माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
मराठा वनवास यात्रा गेल्या महिनाभरापासून आझाद मैदानावर पावसात बसलेली आहे. दोन तीन दिवसांपासून पोलिसांनी आंदोलन कर्त्यांवर केलेल्या अत्याचारामुळे समाजात फार मोठी चीड निर्माण झाली आहे. ज्या कोपर्डीच्या घटनेमुळे महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी पडली. त्या भगिनीच्या स्मृती दिनीच आंदोलकांना धरपकड करून डांबून ठेवल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून रोष व्यक्त केला जात आहे. मराठा वनवास यात्रेला समर्थन म्हणून येत्या 17 तारखेला हजारो मराठा बांधव मुंबई मध्ये दाखल होणार आहेत. त्यापूर्वीची तयारी म्हणून भारतीय मराठा संघाच्या अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. विविध मराठा संघटनांचा पाठिंबा मिळत चालल्याने मराठ आंदोलनाची ठिणगी पडली असल्याचे दिसून येत आहे.
या ठिणगीचे वणव्यात रूपांतर होण्याच्या आधी मराठा समाजाच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात. जर चर्चाच करायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात आले पाहिजे अशी ठाम भूमिका योगेश केदार यांनी मांडली.
मराठ्यांना संविधानाच्या चौकटीत टिकणारे तसेच राज्यसरकारच्या अखत्यारीत असणारे ओबीसी आरक्षण द्यावे यासाठी ही वनवास यात्रा आहे. गेल्या दोन अडीच महिने गावोगावी जाऊन जनजागृती केली गेली आहे. महिन्यांपासून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण बाबत जनजागृती करत आहे. कितीही जुलूम जबरदस्ती केली तरी आम्ही मैदान सोडणार नाही.
केवळ 17% लिंगायत समाजाने कर्नाटक मध्ये भाजपचे सरकार घालवले. जर का 32% मराठा समाजाने एखाद्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर सत्ताधाऱ्यांची पळता भुई थोडी होईल. जो पक्ष आणि नेता मराठ्यांच्या ओबीसी आरक्षण मागणीचा विरोध करेल त्यांच्या विरोधात संपूर्ण मराठा समाज काम करेल. निवडणुकीत धडा शिकवेल. असा निर्वाणीचा इशारा मराठा वनवास यात्रेचे योगेश केदार यांनी दिला.

