पनवेल प्रतिनिधी
'आरोग्य हीच संपत्ती' या उक्तीप्रमाणे चांगले आरोग्य ही एक संपत्ती आहे. चांगले आरोग्य आपणास योगामुळे लाभते. योगा म्हणजे शरीर, मन व आत्म्याला एक करून वर्तमान काळात जगणे. योगा हा एक मानसिक व्यायाम आहे जो मन शांत ठेवण्यास व माणसाची अंतर्भूत शक्ती वाढवण्यास मदत करतो म्हणूनच म्हटले जाते 'योग असे जेथे आरोग्य वसे तेथे'
आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून आदरणीय श्री. धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल व पदवीधर प्रकोष्ठ ,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१/०६/२०२३ रोजी दुपारी ०२.०० वाजता 'वाढता ताण तणाव आणि योग' या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
सदर मार्गदर्शन सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ.मितल खैरनार,BAMS DYA, आयुर्वेदाचार्य व योगउपचार तज्ञ, मा.श्री.धनराजजी विसपुते, चेअरमन आदर्श शैक्षणिक समूह, प्रदेश संयोजक, पदवीधर प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी, मा. डॉ. सीमा कांबळे, प्राचार्य श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल, सर्व प्राध्यापक आणि बी.एड., एम. एडचे सर्व विद्यार्थी व प्रकोष्ठचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीचा ताणतणाव वाढत आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणाने ताण येत असतो. या ताणाचे व्यवस्थापन योगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल यासंबंधीचे मार्गदर्शन अतिशय सुंदर पद्धतीने प्रमुख अतिथी डॉ.मितल खैरनार यांनी केले. त्याचप्रमाणे मा.श्री. धनराजजी विसपुते यांनी आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी योगा करणे आवश्यक आहे याविषयी जाणीव करून दिली. मा डॉ. सीमा कांबळे यांनी ताण तणाव दूर करण्यासाठी योग करणे सर्वोत्तम मार्ग आहे या विषयी माहिती आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केली. उपस्थित मान्यवरांचे आभार मानून मार्गदर्शन सत्राची सांगता करण्यात आली.