शेळवे प्रतिनिधी
शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल येथे योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला, योगा दिनाच्या निमित्ताने प्रशालेचे सहशिक्षक मोहन गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध प्रात्यक्षिके सादर करून दाखवली,त्याप्रमाणे विध्यार्थ्यांनी अप्रतिम प्रतिसाद दिला, प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष एस टी गाजरे यांनी विध्यार्थ्यांना योगासनाचे महत्व पटवून दिले, वयक्तिक तसेच कौटुंबिक आरोग्य टिकवण्यासाठी आपल्या शरीराला व्यायामाची तसेच योगासनांची खूप गरज असल्याचे त्यांनी सांगितले प्रशालेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे व संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद यांनीही योगा दिनाच्या निमित्ताने सक्रिय सहभाग नोंदवला.
सदर कार्यक्रमात एकूण ३६० विध्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तर लहान गटातील ६५ विध्यार्थ्यांनी योगासन प्रात्यक्षिक पाहण्याचा आनंद घेतला.
सर्व शिक्षक, पालक तसेच विध्यार्थ्यांच्या अप्रतिम प्रतिसादासह आजचा योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला...!!