भाळवणी प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयातील पाचवी ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सकाळी 7:45 पासून क्रिडा शिक्षक गजानन जमदाडे यांनी योग प्रात्यक्षिक दाखविले.
यावेळी ताडासन, वृक्षासन ,अर्धचक्रासन, त्रिकोणासन, शशांकासन भुजांगासन सूर्यनमस्कार या आसना विषयी माहिती सांगून प्रात्यक्षिक दाखविले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एन एम गायकवाड ,उपप्राचार्य पिसे सर , पर्यवेक्षक रोकडे सर व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे योगासने आणि योग प्राणायाम केला.अशा रीतीने विद्यालयांमध्ये योग दिन अतिशय उत्कृष्ट रीतीने संपन्न झाला.