म्हसवड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात शिंपी समाज बांधवांची संख्या 65 लाख पेक्षा अधिक आहे. या समाजातील युवकांना कापड व शिलाई व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज भासत आहे. राज्यातील बहुसंख्य समाज बांधव भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जोडले गेलेले आहेत.तेव्हा समाजातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे व सुजित आंबेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माण तालुका दौऱ्याच्या वेळी राज्यातील शिंपी समाज बांधवांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी असे निवेदन दिले आहे.
यावेळी आमदार जयकुमार गोरे, ,भाजप ओबीसी युवक प्रदेशाध्यक्ष करण भैय्या पोरे, नामदेव चांडवले,शिंपी समाज बांधव आदी उपस्थित होते.
यावेळी मागणी प्रमाणे शिंपी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापनेबाबत कार्यवाही सुरू करु असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.अशी माहिती नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी दिली आहे.