पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर आषाढी यात्रा 2023 भाविक व यात्रेकरूंच्या सुख सोयी सुविधा पंढरपूर नगरपालिकेने व ग्रामीण भागामध्ये रस्ते दुरुस्ती करण्यात सुरुवात झाली असून गोपाळपूर येथील संत जनाबाई यांचा ताकाचा डेरा पाठीमागील बाजूस रस्ता डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. या डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते दिलीप भाऊ गुरव यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला.
आमदार आवतडे यांच्या सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वावर आणि समर्पणशील सामाजिक कार्य कौशल्यांवर नेहमीच प्रेम करणाऱ्या गोपाळपूर नगरीच्या जनतेसाठी आवश्यक मूलभूत, पायाभूत आणि भौतिक सोयी - सुविधा सदर निधीच्या माध्यमातून मार्गी लागतील आणि गावाचा चौफेर विकास वारू वेगाने पुढे सरसावेल असा ठाम विश्वास आमदार आवतडे यांनी व्यक्त केला.
सदर प्रसंगी उपसभापती विजयसिंह दादा देशमुख, सरपंच विलास मस्के, उपसरपंच उदय पवार, युवा नेते महेश चव्हाण, ग्रा. प. स.राहुल माने,ग्रा. प. स. अरुण बनसोडे,ग्रा. प. स.श्री.पांडूरंग देवमारे,ग्रा. प. स.अजय जाधव,ग्रा. प. स. किरण पवार पाटील, उल्हास कोले,विजय भूमकर, नागू तात्या बनसोडे, निवृत्ती चव्हाण,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.